Ladki Bahin Yojana Documents : या कागदपत्रात मिळाली मोठी सूट

Ladki Bahin Yojana Documents : राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहिन्याला 1500 रूपये जमा होणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 21 ते 65 या वयोगटातील महिला व मुलींनी कागदपत्राची जुळवाजुळव सुरु केली आहे. मात्र या सगळ्यांमध्ये कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात नवविवाहितांना खूप मोठ्या अडचणी येत आहेत. यावर आता सरकारने नवविवाहितांना दिलासा दिला आहे.

खरं तर यंदाच्या वर्षी अनेक तरूणींची लग्न झाली आहेत. त्यामुळे या तरूणींना त्यांच्या कागदपत्रात अनेक बदल करून घ्यायची आहेत. काही नवविवाहितांनी त्यांच्या माहेरातील रेशन कार्डवरून नावं काढली नाही आहेत. तर काही नवविवाहितांनी माहेरातून रेशनकार्डवरून नाव काढले आहेत, परंतू अद्याप ते नवऱ्याकडील रेशनकार्डवर चढली नाही. त्यात त्याच्याजवळ उत्पन्नाचा दाखला देखील नाही. त्यामुळे त्यांची एका कागदपत्रांमुळे मोठी अडचण होत होती. आता यामध्ये राज्य सरकारने त्यांना दिलासा दिला आहे.

Ladki Bahin Yojana Documents

राज्य सरकारने अशा नवविवाहितांना मोठा दिलासा दिला आहे. नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशनकार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र (Marriage Certificate) असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे नवविवाहितांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment