Ladka Bhau Yojana Online Apply : लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कसा..

Ladka Bhau Yojana Online Apply : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठी देखील एक योजना आणली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. मुख्यंमंत्र्यांनी ‘लाडका भाऊ’ योजना जाहीर केली . या योजनेअंतर्गत १२ वी पास झालेल्या तरूणांना दरमहा ६ हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना ८ हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना १० हजार स्टायपेंड देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

जो तरुण 12 वी उत्तीर्ण झाला असेल, त्याला दरमहा सहा हजार रुपये दिले जातील. तर डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये मिळतील. तसेच पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिन्याला दिले जातील. यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. तसेच अर्जदाराचे बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेले असले पाहिजे.

Ladka Bhau Yojana Online Apply

  • या योजनेसाठी सर्वात पहिली अट ही संबंधित तरुण हा मूळचा महाराष्ट्राचा असावा.
  • दुसरी महत्त्वाची अट म्हणजे तरुणाचं वय हे 18 ते 35 वयोगटाच्या आत असावं.
  • तरुणाचं शिक्षण हे 12 वी पास किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर इतकं झालेलं असावं.
  • संबंधित तरुण हा बेरोजगार असेल तरच त्याला या योजनेचा लाभ मिळेल.
  • तरुणाचं बँक खातं आधारकार्डशी जोडलं गेलेलं असायला हवं.

Documents For Ladka Bhau Yojana

  1. आधारकार्ड
  2. अधिवास प्रमाणपत्र
  3. ड्रायव्हिंग लायसन्स
  4. जन्मदाखला किंवा वयाचा दाखला
  5. शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
  6. मोबाईल नंबर
  7. पासपोर्ट साईज फोटो
  8. बँक खाते पासबुक

Ladka Bhau Yojana Online Apply

  1. तरुणांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
  2. तरुणांना यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.
  3. तिथे होम पेज उघडल्यानंतर New User Registration या बटनावर क्लिक करावं लागेल.
  4. तिथे क्लिक केल्यानंतर लगेच पुढे अर्ज ओपन होईल.
  5. या अर्जात विचारलेली सर्व माहिती तरुणांना अतिशय काळजीपूर्वकपणे भरावी लागेल.
  6. यानंतर अर्जात मागितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  7. सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमीट बटनवर क्लिक करावं लागेल.
  8. अशा माध्यमातून अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

Leave a Comment