Farmer Loan Waiver : या राज्याने केली शेतकऱ्यांची कर्जमाफी, महाराष्ट्रात..

Farmer Loan Waiver : तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी एक लाख रुपये पर्यंतच्या कृषि कर्ज (Agriculture Loan) माफीची घोषणा केली आहे. तेलंगणा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले की, बँकांना निर्देश दिले गेले आहेत की शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज १८ जुलै २०२४ पर्यंत माफ करावे. सरकारने जोर दिला आहे की, कर्ज माफीसाठी जारी करण्यात आलेली रक्कम दुसऱ्या खात्यात जमा केल्यास बँकांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

तेलंगणा सरकारचे मंत्री, आमदार मंगळवारी कर्जमाफीचे लाभार्थी शेतकऱ्यांसह एका समारंभात सहभागी होतील. यापूर्वी तेलंगणा सरकारने दोन लाख रुपये पर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याचे निर्देश दिले होते. राज्य सरकारच्या दिशानिर्देशांनुसार १२ डिसेंबर २०१८ नंतर दिलेले कृषि कर्ज माफ (Agriculture Loan) करण्याचे सांगण्यात आले होते, जे ९ डिसेंबर २०२३ पर्यंत चुकवायचे होते. ही प्रक्रिया गुरुवार (१८ जुलै २०२४) पासून सुरु होऊन १५ ऑगस्टपर्यंत संपवली जाईल.

Farmer Loan Waiver

महाराष्ट्रात कर्जमाफी कधी ?

संभाजीनगर येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. माजी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी कर्जमाफीबद्दल महत्त्वाची माहिती दिली.

अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, कर्जमाफीच्या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्राशी संपर्क साधून प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Comment