Yuva Karya Prashikshan Yojana : राज्य सरकरानं युवकांसाठी आणलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीत बदल केला आहे. या शासन निर्णयानुसार प्रशिक्षणार्थी उमेदवारांसाठी उपस्थितीनुसारच विद्यावेतन आणि प्रशिक्षण कालावधीत विमासंरक्षण (Insurance Protection) दिला जाणार आहे. त्याचबरोबर या योजनेत सहभागी होणाऱ्या आस्थापनांसाठी देखील काही बदल करण्यात आले आहेत. याबाबतच शासन निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच यावेळी आस्थापनांच्या नियमांत काही बदल करण्यात आले आहेत. आता आस्थापनांना ईपीएफ (EPF), ईएसआईसी (ESIC), जीएसटी (GST), निगमन प्रमाणपत्र (Certificate of Incorporation), उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (Department for Promotion of Industries and Internal Trade (DPIIT)) यांच्याकडील नोंदणी प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. त्याचबरोर केंद्र शासनाचे उद्योग उद्यम / उद्योग आधार यांच्याकडील नोंदणी प्रमाणपत्राची प्रत देखील देणे बंधनकारक असणार आहे. तर नव्या आदेशाप्रमाणे वरील पैकी किमान एक प्रमाणपत्र उद्योजकता आणि कौशल्य विकास विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थाळावर आस्थापनांना अपलोड करावे लागणार आहे.
Yuva Karya Prashikshan Yojana
आस्थापनांना प्रशिक्षणासाठी मनुष्यबळाच्या १० टक्के, सेवा क्षेत्र २० टक्के प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून घेता येतील. केंद्र सरकार, राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापना, महामंडळे, ग्रामपंचायत वगळता इतर स्थानिक स्वराज संस्थांना मंजूर पदाच्या ५ टक्के प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून घेता येतील.
- तर शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी ही संख्या २० असून ग्रामंपचायतीत, गावातील कृषी सहकारी सोसायटींना १ उमेदवार घेता येणार आहे.