Cow Milk Subsidy : राज्यातील ६ लाख गाय दूध उत्पादकांना ९० कोटींचे अनुदान जमा

Cow Milk Subsidy : राज्यात गायीच्या दुधाचे दर कमी झाल्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. दरम्यान यावर राज्य सरकारने दूध (Milk rate) उत्पादकांना गायीच्या दूधाला ५ रूपये अनुदान देण्याचे ठरवले. यामध्ये राज्यातील सहकारी दूध संघांना हे अनुदान देण्यात आले आहे. राज्यातील ६ लाख ३०३ शेतकऱ्यांच्या खात्यांवर आतापर्यंत तब्बल ९० कोटी ९० लाख ८५ हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात आल्याची माहिती राज्य दुग्ध विभागाकडून देण्यात आली आहे.

गायीच्या दुधाचे दर घसरल्यानंतरही कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील दूध संस्थांनी प्रतिलिटर ३३ रुपये दर देत आहेत. परंतु राज्यातील अन्य ठिकाणी खासगी दूध संघ तर २५ ते २८ रुपये दराने (Cow Milk Subsidy) खरेदी करत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने ११ जानेवारी ते १० मार्च या दोन महिन्यांच्या कालावधीतील दूध खरेदीला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला.

Cow Milk Subsidy

त्यानुसार या दोन महिन्यांत शासनाच्या निकषानुसार ६ लाख ३०३ दूध उत्पादक (milk subsidy) शेतकऱ्यांचे सुमारे ३३ कोटी लिटर गाय दूध अनुदानासाठी पात्र ठरले आहे. त्यापोटी १६५ कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या दोन महिन्यांत शासनाच्या निकषानुसार ६ लाख ३०३ दूध उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे ३३ कोटी लिटर गाय दूध अनुदानासाठी पात्र ठरले आहे.

या शेतकऱ्यांना दोन महिन्यांत घातलेल्या दुधापोटी १६५ कोटी रुपये अनुदान मिळणार आहे. हे अनुदान मिळवण्यात पुणे विभाग आघाडीवर राहिला असून, त्यापाठोपाठ नाशिक विभाग आहे. मिळणार असून, त्यापैकी आतापर्यंत १८ कोटी १८ लाख १७ हजार ५ लिटर दुधाचे ९० कोटी ९० लाख ८५ हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले आहे. उर्वरित अनुदान येत्या चार ते पाच दिवसात मिळणार असल्याची माहिती राज्याचे आयुक्त मोहोड यांनी माहिती दिली.

Solar Agriculture Pump
Solar Agriculture Pump

2 thoughts on “Cow Milk Subsidy : राज्यातील ६ लाख गाय दूध उत्पादकांना ९० कोटींचे अनुदान जमा”

Leave a Comment