Weather Update : राज्यात पावसाचा अंदाज, कुठे गारपीट होण्याची शक्यता

Weather Update : पुणे शहरात (weather in pune today) सकाळी पुणेकरांना उकाड्यापासून जरासा दिलासा मिळाला. कारण सकाळी हवेत गारवा असल्याने उष्णतेपासून काहीशी सुटका झाली. पण, दुपारी मात्र सूर्यनारायण चांगलाच आग ओकत होता. येत्या ७२ तासांमध्ये पुण्यात हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान (weather report) खात्याने दिला आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान मालेगावात ४२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. विदर्भातील कमाल तापमानात मोठी घट झाली असून, काही शहरांचे तापमान ३० अंशांच्या खाली नोंदवले गेले.

शहरातील किमान तापमान शिवाजीनगरला १९.८, तर वडगावशेरीला २६.६, मगरपट्टा येथे २६.१ आणि कोरेगाव पार्क येथे २५.२ अंश सेल्सिअस होते. कमाल तापमानही (weather today) चाळिशीच्या जवळपास नोंदले गेले. बुधवारी शिवाजीनगरचे कमाल तापमान ३९.५ तर वडगारवशेरी, कोरेगाव पार्क येथील कमाल तापमान ४१.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

Weather Update

हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

वातावरणाच्या स्तरातील वाऱ्याची खालची द्रोणिका रेषा गुरुवारी नैऋत्य राजस्थान व तटीय कर्नाटकपर्यंत कोकण-गुजरातवरून जात आहे.- एक चक्रवात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यावर आहे. मध्य महाराष्ट्रात ११ ते १३ व १५ ते १७ तारखेला आणि मराठवाड्यात ११ ते १७ एप्रिल दरम्यान मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल.- विदर्भात ११ ते १२ तारखेला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गारपीटही होण्याची शक्यता आहे.- अकोला, बुलढाणा, नागपूर, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी पावसाचा अंदाज आहे.

Solar Agriculture Pump
Solar Agriculture Pump

Leave a Comment