Seed

Seed : शेतकऱ्यांनो, आताच अर्ज करा, ५० टक्के अनुदानावर उडीद, भुईमुग, तुर बियाणे

Seed : नाशिक जिल्हा परिषद सेस फंड योजनेतंर्गत ५० टक्के अनुदानावर उडीद, भुईमुग, तुर बियाणे  (Tur Seed) पंचायत समितीकडुन मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांना बियाणे आवश्यक असल्यास त्यांनी आजपासुनच पंचायत समिती कृषि विभागात बियाणे मागणी अर्ज भरून द्यावे, असे आवाहन पंचायत समितीमार्फत (Nashik Panchayat Samiti) करण्यात आले आहे. संबंधित योजनेचे अर्ज पंचायत समिती कृषि विभागात उपलब्ध आहेत.

शेतक-यांचा मागणी अर्ज विहीत नमुन्यात घेण्यात यावा. अर्जासोबत स्वताचे कुटुंबाचे नांवे असलेले ७/१२ व ८-अ चे अद्यावत उतारे सादर करणे आवश्यक आहे. एका लाभार्थ्यास जास्तीत जास्त १ हेक्टरसाठी आवश्यक बियाण्याचा लाभ देण्यात यावा. (सदर बियाणेचा लाभ देताना एका पेक्षा अधिक बियाणेचा क्षेत्र मर्यादेत लाभ देय आहे.)

Seed Subsidy

बियाणे आणि त्यांची किंमत

या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ नाशिक यांच्याकडून हे बियाणे पुरवण्यात येत आहेत. यात तूर बियाण्याची दोन किलोची बॅग असून तिची किंमत 420 रुपये आह. तर शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर देण्यात येत असल्याने ती केवळ 210 रुपयाला मिळणार आहे.

मूग बियाण्यांची 02 किलोची बॅग 450 रुपयांना असून शेतकऱ्यांना किंवा 225 रुपये भरावे लागणार आहेत. त्यानंतर उडीद बियाण्यांची दोन किलो ची बॅग असून ती 380 रुपयांना असून यापैकी शेतकऱ्यांना केवळ 190 रुपये भरावे लागणार आहे. तर भुईमुगाची 20 किलोची बॅग असून 3200 रुपयांना आहे. शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर 1600 रुपयांना मिळणार आहे.

५० टक्के अनुदानावर बियाणे 

योजनेत ५० टक्के अनुदानावर तूर, मुग, उडीद, भुईमुग व हरभरा बियाणे देण्यात यावे. उर्वरीत ५० टक्के वसुल करावयाची रक्कम गटस्तरावर बियाणे वाटप करणेपुवी शेतकऱ्यांकडून वसुल करुन पुरवठादार संस्थेच्या नावे डी डी धनादेश काढून या कार्यालयास पाठविण्यात यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *