SBI Recruitment : स्टेट बँकेत बंपर भरती, 7000 हून अधिक रिक्त पदांवर भरती

SBI Recruitment 2024 : बँकेत नोकरीच्या (Bank Job Vacancy) शोधात असणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. भारतीय स्टेट बँकेत (State Bank of India) बंपर भरती करण्यात येणार आहे. भारतीय स्टेट बँकेत 7000 हून अधिक पदांवर बंपर भरती करण्यात येईल. या भरती संदर्भातील अधिसूचना अद्याप जारी करण्यात आलेली नाही. मात्र, लवकरच ही भरती जाहीर होण्याची शक्यता आहे.

या स्टेट बँकेच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना एप्रिल महिन्यात जारी होण्याची शक्यता आहे. तर अंदाजानुसार, या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख मे महिन्यापर्यंत असेल, असा अंदाज आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही sbi.co.in या अधिकृत वेबसाईटला (SBI Recruitment 2024 Apply Online) भेट देऊ शकता.

SBI Recruitment 2024

  • रिक्त पदे : विशेष अधिकारी, लिपिक आणि इतर पदे
  • रिक्त पदांची संख्या : 7000 हून अधिक
  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : एप्रिल महिन्यात अधिसूचना जारी होऊ शकते.
  • भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदासाठी पात्र उमेदवाराला हिंदी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये टायपिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • भारतातील कोणत्याही विद्यापीठातून बॅचलर पदवी

SBI Recruitment 2024

  • जनरल/ओबीसी (GEN/OBC) – 750 रुपये
  • SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क माफ असेल.
  • या भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय 20 वर्षे असणे आवश्यक आहे आणि कमाल वय 28 वर्षे असणे आवश्यक आहे. विविध पदांसाठीची वयोमर्यादा वेगवेगळी असू शकते.
  • एसबीआय लिपिक पदावर निवड झालेल्या उमेदवाराला मूळ वेतन 19900 रुपये आहे, तर महिन्याच्या शेवटी भत्ते आणि भत्ते मिळून त्याला 29000 ते 30000 रुपये पगार मिळतो.

1 thought on “SBI Recruitment : स्टेट बँकेत बंपर भरती, 7000 हून अधिक रिक्त पदांवर भरती”

Leave a Comment