PM Vishwakarma yojana नमस्कार मित्रांनो आता पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत राज्यातील बऱ्याच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर केंद्र सरकारकडून विश्वकर्मा योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना विविध असंघटित क्षेत्रातील कामगारांना प्रशिक्षण व साहित्य खरेदी तसेच स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याकरिता केंद्र सरकारकडून पीएम विश्वकर्मा ही योजना राबवण्यात आली.
या योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक भागातून विविध घटकांसाठी जसे की सोनार कुंभार लोहार शिंपी धोबी अशा विविध असंघटित कामगारांना नोंदणी करून साहित्य खरेदीसाठी 15000 रुपये आर्थिक सहाय्य व प्रशिक्षणा दरम्यानचे प्रति दिवस पाचशे रुपये याप्रमाणे निधी वितरित केला जातो बऱ्याच जणांना हे प्रशिक्षण कधी कोठे व कशा स्वरूपात घेतले जाते याबद्दलची माहिती नाही आजच्या लेखातून आपण विश्वकर्मा योजना अंतर्गत मिळणारे प्रशिक्षण कधी व कोठे दिले जाते याबद्दलची माहिती घेणार आहोत.
मोफत रेशन कार्ड कसे काढायचे पहा येथे क्लिक करून
मोफत शिलाई मशिन योजना, अर्ज केलाय पण आता पुढे काय
विश्वकर्मा शिलाई मशीन प्रशिक्षण कोणाला दिले जाते.
विश्वकर्मा योजना अंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केले आहेत त्यांचे त्यांच्या ग्रामपंचायत किंवा नगरपरिषद स्तरावर पहिली तपासणी केली जाते त्यानंतर जिल्हा उद्योग केंद्रांतर्गत त्यांची दुसरी तपासणी केली जाते .
या तपासणीनंतर जे अर्ज मंजूर झाले ते अर्ज कौशल्य विकास विभागाकडे पाठवले जातात कौशल्य विकास विभागाकडून अर्जदारांना ट्रेनिंग म्हणजेच प्रशिक्षण देण्यासाठी ठिकाण व वेळ निश्चित केली जाते त्यानुसार त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येते.
प्रशिक्षण कोठे असते
विश्वकर्मा शिलाई मशीन प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांची प्रशिक्षण घेणे करीता निवड झाली आहे त्याला आभार त्यांना कौशल विकास विभागामार्फत स्थान व वेळ निश्चित केली जाते हे प्रशिक्षण आपल्या भागातील जे आयटीआय कॉलेज आहे त्या ठिकाणी याचा आयोजन कौशल्य विभाग मार्फत केले जाते कारण त्या ठिकाणी प्रशिक्षणा दरम्यान आवश्यक लागणाऱ्या सर्व वस्तू उपलब्ध असतात त्यामुळे आपल्या जवळील आयटीआय कॉलेज यामध्ये आपले प्रशिक्षण निश्चित केले जाते ज्या कॉलेजमध्ये निश्चित केला आहे त्या कॉलेजचे नाव तसेच पत्ता आपल्याला एसएमएस द्वारे पाठवण्यात येतो.
शिलाई मशीन साठी कोणत्या महिला पात्र
तुम्ही प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्हाला शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारकडून 15000 रुपये मिळतील. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की ती मोफत शिलाई मशीन योजनेच्या नावाखाली चालत असली तरी तिचे खरे नाव विश्वकर्मा योजना आहे. या शिलाई यंत्र योजनेत शिंपी वर्गातील महिला व पुरुषांना लाभ मिळत आहे. सध्या ही योजना लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. आज आम्ही तुम्हाला या योजनेसाठी नोंदणी कशी करू शकता हे सांगणार आहोत. तर मित्रांनो तुम्हाला खालील प्रमाणे लिंक दिली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.
ईपिक पाहणी कशी करायची पहा येथे क्लिक करून
अर्ज करण्याची प्रक्रिया☝️
१)तुम्हाला भारत सरकारच्या सेवा पोर्टलवरून पीएम सिलाई मशीन नोंदणी पृष्ठ उघडावे लागेल .
२)यानंतर तुम्हाला Google मध्ये प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना उघडावी लागेल.
३)ओपन केल्यानंतर तुम्हाला Apply चा पर्याय दिसेल, आता तुम्हाला tailor पर्यायावर क्लिक करून निवडावे लागेल.
४)अर्ज प्रक्रिया सुरू होईल. अर्ज करताना, तुम्हाला बँक खाते आणि रेशन कार्डशी संबंधित सर्व माहिती भरावी लागेल.
५)या योजनेसाठी कुटुंबातील एकच महिला किंवा पुरुष सदस्य अर्ज करू शकतात.