PM Kisan 17th installment : शेतकऱ्यांसाठी (Farmers) मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.पंतप्रधान किसान सन्मान निधीचा (PM-Kisan Samman Nidhi) हप्ता कधी मिळणार अशी सर्वत्र चर्चा सुरु होती. अखेर पंतप्रधान किसान सन्मान निधीची तारीख निश्चित झाली आहे. येत्या 18 जून रोजी PM किसान योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते काशीतून या 17व्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे.
किसान सन्मान निधीची प्रतीक्षा आता संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 17 व्या हप्त्याचे पैसे काशीमधून योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात सोडणार आहेत. याआधी 10 जून रोजी पीएम मोदींनी पीएम किसान योजनेच्या फाइलवर स्वाक्षरी केली होती. त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील ही पहिली फाईल होती, जी त्यांनी पास केली आहे. शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या या योजनेच्या 16 हप्त्यांमध्ये आतापर्यंत 12 कोटी 33 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना 3 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम डीबीटीमधून थेट वितरित करण्यात आली आहे.
PM Kisan 17th installment
मोदी 3.0 सरकारचा पहिला निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेण्यात आला आहे,.ज्या अंतर्गत किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता (PM Kisan 17th installment) 18 जून 2024 रोजी जारी केला जाईल. आत्तापर्यंत केंद्र सरकारने पीएम किसानचे 16 हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले आहेत. पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता (पीएम किसान 16 वा हप्ता) 28 फेब्रुवारी 2024 रोजी हस्तांतरित करण्यात आला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 जून रोजी PM किसान निधीचा 17 वा हप्ता जारी करण्यासाठी त्यांच्या पहिल्या फाईलवर स्वाक्षरी केली होती. ज्यामध्ये 9.3 कोटी शेतकऱ्यांना 17 वा हप्ता देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. सुमारे 20,000 कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत. त्यामुळं ही देशातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे.