PM Awas Yojana Rural : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (Awas Yojana Rural) योजनेत मोठे बदल करण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली. या योजनेत ग्रामीण भागातील ज्या कुटुंबांकडे दुचाकी,मोटारआधारित मासेमारीच्या बोटी, फ्रीज, लँडलाईन फोन होते त्यांना सहभागी होता नव्हतं. अखेर या अटी शिथील करण्यात आल्याची घोषणा शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे. याशिवाय संबंधित कुटुंबाची मासिक उत्पन्नाची अट देखील 10 हजारांवरुन 15 हजार रुपये करण्यात आलेली आहे.
जांच्याकडे तीन चाकी आणि चार चाकी वाहनं आहेत, किंवा शेतीसाठी लागणारं तीन आणि चार चाकी वाहन किंवा यंत्र आणि किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 50 हजार असेल, सरकारी कर्मचारी, नोंदणीकृत अकृषिक क्षेत्रातील उद्योजक, प्राप्तिकर भरणारे व्यक्ती, व्यवसाय कर भरणारे व्यक्ती आणि अडीच एकरांपेक्षा अधिक जमीन असणाऱ्या ग्रामीण भागातील व्यक्तींना पीएम आवास योजना ग्रामीणचा लाभ घेता येणार नाही.
PM Awas Yojana Rural
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जमीनधारणेसंदर्भातील अपात्रतेच्या नियमात व्यावहारिक बदल केले जातील, असंही म्हटलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण द्वारे संबंधित नागरिकांना आर्थिक मदत केली जाते. यामध्ये ग्रामीण भागात घरं उभारणीशाठी 1 लाख 20 हजार रुपयांची तर डोंगरी भागातील नागरिकांना 1 लाख 30 हजार रुपयांची मदत केली जाते.