Majhi Kanya Bhagyashree : मुलगी जन्माला येताच लखपती होणार..

Majhi Kanya Bhagyashree : केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यात मुलींसाठी काही विशेष योजना राबवल्या आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी मदत म्हणून काही योजना राबवल्या जातात. महाराष्ट्र सरकारची मुलींसाठी खास योजना आहे. माझी कन्या भाग्यश्री असं या योजनेचं नाव आहे.

या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मानंतर महाराष्ट्र शासनाकडून ५०,००० रुपये मिळतात. केंद्र सरकारने (Central Government) २०१६ साली मुलींसाठी खास योजना राबवली आहे. या योजनेत मुलींच्या जन्मावेळी पालकांना ५०,००० रुपये दिले जातात. या योजनेत विमा संरक्षणही दिले जाते. मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी, या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे.

Majhi Kanya Bhagyashree

  • माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी लाभ घेण्यासाठी अर्जदार हे महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • या योजनेत आई आणि मुलीच्या नावाने संयुक्त खाते उघडले जाते.
  • त्यांना १ लाख रुपयांना अपघात विमा (Health Insurance) आणि ५० हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट दिला जातो.
  • याशिवाय मुलीच्या जन्मानंतर पालकांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी लागेल.
  • त्यानंतर त्यांना ५० हजार रुपये दिले जाणार आहे.
  • दोन मुलींच्या जन्मानंतर जर शस्त्रक्रिया केली तर २५,०००-२५,००० रुपये दिले जाणार आहे.

Majhi Kanya Bhagyashree Yojana

  1. माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत मिळालेली रक्कम ही मुलींच्या शिक्षणासाठी वापरली जाऊ शकते.
  2. या योजनेचा लाभ दारिद्रय रेषेखाली तसेच एपीएल पांढरे रेश कार्डधारक लाभ घेऊ शकतात.
  3. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे.
  4. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारकांना मुलीच्या जन्मानंतर अनुदान देण्यात येते.
  5. मुलीचे वय १८ वर्ष झाल्यानंतर ७५ हजार रुपये दिले जातात.
अर्ज कसा करावा ?
  • माझी कन्या भाग्यश्री योजनेत नोंदणी करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर फॉर्म डाउनलोड करुन तो भरावा लागेल. फॉर्म भरल्यानंतर तो तुम्हाला महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडे जमा करावा लागेल.

Leave a Comment