Maharashtra New Governor : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल सीपी राधाकृष्णन ?

Maharashtra New Governor : सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल (Maharashtra New Governor CP Radhakrishnan) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश बैस यांच्याजागी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ते झारखंडचे (Jharkhand) राज्यपाल होते.

राज्यात विधानसभा निवडणुकांची (Vidhansabha Election) तयारी सुरु आहे. अशातच राधाकृष्णन यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, सीपी राधाकृष्णन हे नेमके कोण? त्यांची राजकीय कारकिर्द काय? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.

Maharashtra New Governor

सीपी राधाकृष्णन हे दीर्घकाळापासून भाजपचे सदस्य आहेत. लहान वयातच ते भारतीय जनसंघाचे सदस्य झाले होते. यावेळी त्यांचे वय 17.5 वर्ष होते. सीपी राधाकृष्णन हे देखील दोन वेळा लोकसभेचे सदस्य राहिले आहेत. 1998 आणि 1999 च्या सार्वत्रिक निवडणुका त्यांनी भाजपच्या तिकिटावर जिंकल्या. पण 2004, 2012 आणि 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला. तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले होते. तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत.

कोणत्या राज्यात कोण नवीन राज्यपाल ?

  • हरिभाऊ किसनराव बागडे यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
  • जिष्णू देव वर्मा यांची तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
  • ओम प्रकाश माथूर यांची सिक्कीमचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
  • संतोष कुमार गंगवार यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
  • रामेन डेका यांची छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
  • सी एच विजयशंकर यांची मेघालयचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
  • सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्रचे राज्यपाल म्हणून नियुक्ती

Leave a Comment