Ladli Behna Yojana List : राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यत 1 कोटी 25 लाख 44 हजार 083 महिलांनी अर्ज केले आहेत.
या अर्जदार महिलांना (Applicant Women) आता पात्रता यादीची (Eligibility List) प्रतिक्षा लागली आहे. त्यामुळे आता महिलांना पात्रता यादी कुठे पाहता येणार आहे? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana where can you see the eligibility list of mukhymantri ladki bahin yojana scheme read full details)
Ladli Behna Yojana List
लाडकी बहिण योजनेची घोषणा झाल्यापासून दररोज हजारोंच्या संख्येने महिला अर्ज भरत आहेत. दररोज साधारण 70 ते 80 हजार महिला अर्ज करत आहेत. आता या अर्जदार महिलांची संख्या 1 कोटी 25 लाख 44 हजार 083 च्या घरात पोहोचली आहे. या महिलांसमोर आता त्यांचा अर्ज पात्र की अपात्र ठरला आहे की नाही? असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे या महिलांना पात्रता यादीची प्रतिक्षा लागली आहे.
- लाडकी बहीण योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांना त्यांच्या गावात पात्रता यादी पाहता येणार आहे.
- प्रत्येक गावात समिती मार्फत दर शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचली जाणार आहेत.
- त्यामुळे या दरम्यान महिलांना त्यांचा अर्ज योजनेसाठी पात्र ठरला आहे की नाही? याची माहिती मिळणार आहे.
- त्यामुळे महिलांना गावातील समितीची यादी वाचणा दरम्यान हजर राहावे लागणार आहे.