पण राज्यातील मुलींना तब्बल 75000 रुपयांची आर्थिक मदत करणारी ‘लेक लाडकी’ ही योजना (Lek Ladki Yojana) अनेकांना माहिती नाही. या योजनेच्या माध्यमांतून मुलींना अर्थसहाय्य केले जाते. याच पार्श्वभूमीवर ही योजना नेमकी काय आहे? या योजनेच्या लाभासाठीच्या अटी काय आहेत? हे जाणून घेऊ या.
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana
योजनेचे उद्दीष्ट काय आहे? (Lek Ladki Yojana Information)
मुलींना नेमका काय लाभ मिळणार? (Lek Ladki Yojana Benifits)
- पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत 6 हजार रुपये, सहावीत 7 हजार रुपये, अकरावीत 8 हजार रुपये, तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतर 75 हजार रुपये याप्रमाणे एकूण 1 लाख 1 हजार रुपये देण्यात येतील.
योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहेत? (Lek Ladki Yojana Rules And Conditions)
- ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील. पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हफ्त्यासाठी व दुसऱ्या आपत्याच्या दुसऱ्या हफ्त्यासाठी अर्ज सादर करताना माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी आपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनचा लाभ मिळेल. मात्र त्यानंतर मात्या किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana
- 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आहे आणि त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र माता-पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहील. लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.