ITR Filing Last Date : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला आहे, 31 जुलै ही आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख आहे, परंतु अजूनही अनेकांनी आयकर विवरणपत्र भरलेले नाहीये. त्यामुळे आयटी रिटर्न भरण्यासाठी वेळ वाढवून द्यावा अशी मागणी ऑल इंडिया टॅक्स प्रॅक्टिशनर्स (AIFTP) ने सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) कडे केली आहे.
आर्थिक वर्ष 2024-25 साठीचे आयकर विवरणपत्र सादर करण्यासाठीची मुदत 1 महिन्याने वाढवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे मात्र, आयकर विभागाकडून आयटी रिटर्न भरण्यासाठीची मुदत वाढवून देण्याबाबात कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.
ITR Filing Last Date
असे उद्योगपती ज्यांच्या खात्यांचं ऑडिट करणं आवश्यक आहे ते 31 ऑक्टोबरपर्यंत त्यांचा आयकर परतावा भरु शकतात. आयकर विभाग या व्यावसायिकांना 3 महिन्यांचा अधिक वेळ देतो, जेणेकरून ते त्यांच्या खात्यांचे एखाद्या मान्यताप्राप्त सीएकडून ऑडिट करून घेतील आणि नंतर त्यांचा आयकर परतावा दाखल करू शकतील. जर त्यांचं असं एखादं खातं असेल ज्यासाठी ऑडिट आवश्यक असेल तर त्यांना 31 ऑक्टोबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे.
आयकर विभाग काही प्रकारच्या व्यवहारांसाठीही आयटीआर भरण्यात सूट देतो. एखाद्या व्यवसायाला त्याच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारांमधील हस्तांतरण किंमतीचा अहवाल भरण्याची आवश्यकता असल्यास, अशा व्यवसायांना 30 तारखेपर्यंत त्यांचा आयटीआर भरण्याची परवानगी आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहारांव्यतिरिक्त, त्यात विशिष्ट प्रकारचे देशांतर्गत व्यवहार देखील समाविष्ट आहेत.