IND VS BAN 1st Test Match

IND VS BAN 1st Test Match, नमस्कार मित्रांनो सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये कसोटी सामना रंगला आहे तर भारताच्या पहिल्या दोन-तीन विकेट अवघ्या 34 रानामध्ये पडल्या होत्या तर चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील टेस्ट सीरिजचा पहिला सामना खेळवण्यात येत आहे. यात पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने बांगलादेशच्या गोलंदाजांना अक्षरशः घाम फोडला. टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज आउट झाल्याने टीम संकटात असताना अश्विन आणि जडेजा हे दोघे खऱ्या अर्थाने टीम इंडियाचे संकटमोचक ठरले. पहिल्या दिवसाअंती भारताने तब्बल 339 धावांची आघाडी घेतली.

 

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर गुरुवारी भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात टेस्ट सीरिजच्या पहिल्या सामन्याचा पहिला दिवस पार पडला. यात सुरुवातीला बांगलादेशच्या कर्णधाराने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

 

सुरुवातीला बांगलादेशच्या बॉलिंग अटॅक समोर टीम इंडियाची फलंदाजी ढासळली, पहिल्या 10 ओव्हरमध्ये विराट कोहली (6) , रोहित शर्मा (6) आणि शुभमन गिल (0) या तिघांची विकेट पडली. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंतने टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यशस्वीने 56, ऋषभ पंतने 39 तर केएल राहुलने 16 धावांची कामगिरी केली.

अश्विन जडेजाची मोठी पार्टनरशिप :

ऋषभ पंत बाद झाल्यावर रवींद्र जडेजा मैदानात आला तर केएल राहुलच्या रूपाने भारताचीसहावी विकेट पडल्यावर आर अश्विनला फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. दोघांनी सातव्या विकेटसाठी फलंदाजी करताना तब्बल 195 धावांची पार्टनरशिप केली. यात रवींद्र जडेजाने 117 बॉलमध्ये 86 धावा केल्या. तर आर अश्विनने 112 बॉलमध्ये 102 धावा करून शतक लगावले. या दरम्यान अश्विनने 10 चौकार आणि 2 सिक्स मारले. तर जडेजाने देखील 10 चौकार करत 2 सिक्स ठोकले.

Leave a Comment