Digital Gold Investment

Digital Gold Investment : डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचे नेमके फायदे काय ?

Digital Gold Investment : भारतात सोने खरेदी करून गुंतवणूक करण्याची सवय ही बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. पण आता याच गुंतवणुकीच्या पद्धतीत बदल झाला आहे. आता गुंतवणूकदार प्रत्यक्ष सोने खरेदी करण्यापेक्षा डिजिटल सोन्यात पैसे गुंतवण्याचा पर्याय निवडत आहेत.

तुम्ही डिजिटल गोल्डमध्ये (Digital Gold) पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला डिजिटल गोल्डचे सर्वांत महत्त्वाचे पाच फायदे सांगणार आहोत. डिजिटल गोल्डमध्ये तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून पैशांची गुंतवणूक करू शकता. अशा प्रकारच्या सोन्याची तुम्ही कधीही, केव्हाही खरेदी किंवा विक्री करू शकता.

Digital Gold Investment

लहान गुंतवणूकदारांना डिजिटल गोल्ड (Digital Gold Price) हा गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्यायांपैकी एक पर्याय आहे. तुमच्याकडे फारसे पैसे नसले तरीदेखील तुम्ही डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकता.

डिजिटल गोल्ड खरेदी केल्याने ते चोरी होण्याची भीती नसते. म्हणजेच डिजिटल गोल्डला संरक्षण देण्याची गरज नसते.

प्रत्यक्ष सोन्याच्या धातूच्या तुलनेत डिजिटल सोने तुम्हाला जास्त परतावा देते. डिजिटल सोन्याची विक्री करताना तुम्हाला त्या सोन्याचे 100 टक्के मूल्य मिळते.

डिजिटल सोने विकताना तुम्हाला सोन्याच्या किमतीनुसारच रिटर्न्स मिळतात. म्हणजेच सोन्याची किंमत वाढल्यास त्याचा थेट फायदा तुम्हाला मिळू शकतो. डिजिटल सोने खरेदी करताना किंवा विक्री करताना तुम्हाला घडणावळीचे पैसे देण्याची गरज नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *