Delhi Rain : गेल्या काही दिवसांपासून देशाच्या अनेक भागात पावसाने मोठी हाहाकार माजवला आहे. बुधवारी (31 जुलै 2024) दिल्ली (Delhi NCR) एनसीआरमध्ये हवामान बदलताच, लोकांना दमट उष्णतेपासून दिलासा मिळाला, परंतु अनेक भागात पूर आला. हवामान खात्यानेही देशातील अनेक भागात पावसाचा इशारा दिला आहे.
मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे दिल्लीच्या आयटीओजवळ वाहतूक कोंडी झाली आहे, तर जुन्या राजेंद्र नगरच्या अनेक भागात पुन्हा पाणी साचले आहे.मुसळधार पावसामुळे दिल्लीतील संसद (Delhi Parliament) भवनाच्या प्रवेशद्वारावरही पाणी साचले होते. याशिवाय मयूर विहारमध्ये मुसळधार पावसामुळे नाल्यात एक महिला आणि एक बालक वाहून गेले असून, त्यासाठी बचावकार्य सुरू आहे.
Delhi Rain
वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशात गेल्या २४ तासांत पावसाशी संबंधित घटनांसह विविध आपत्तींमध्ये १५ जणांचा मृत्यू झाला आहे. हरिद्वार जिल्ह्यातील रुरकी भागात अतिवृष्टीमुळे तीन जणांचा मृत्यू झाला. हवामान खात्याच्या (Weather Delhi) अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र आणि पूर्व मध्य प्रदेशात पुढील दोन दिवस (1 आणि 2 ऑगस्ट) मुसळधार पावसाची शक्यता आहे.
- 1 ऑगस्ट 2024 रोजी आसाम, मेघालय, मणिपूर आणि मिझोराममध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
- IMD नुसार, उत्तर भारतात पावसापासून दिलासा मिळणार नाही.
- 1 ऑगस्ट, 2024 रोजी पश्चिम उत्तर प्रदेशात वेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाची (115.6 ते 204.4 मिमी) शक्यता आहे.