Crop Insurance : फळपिक विमा योजना कोणत्या फळपिकाला किती मिळणार विम्याची रक्कम.

Crop Insurance : राज्य सरकारने फळपीक विमा योजना चालू वर्ष २०२४-२५ आणि पुढील २०२५-२६ या वर्षासाठी लागू केली आहे. तर राज्यातील ३० जिल्ह्यांतील फळपिक उत्पादकांना विम्याचा लाभ घेता येणार असून त्यासाठी चार विमा कंपन्यांची (insurance company) निवड सरकारने केली आहे. या विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, ही फळपीक योजना (PMFBY) मृग बहारातील संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सिताफळ, द्राक्ष (क) या पिकांसाठी तर आंबिया बहारातील संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरी व पपई या पिकांसाठी लागू करण्यात आली आहे.

Crop Insurance Premium

फळपिके – विमा संरक्षित रक्कम (रु. प्रति हेक्टर)

  1. संत्रा – एक लाख रूपये प्रति हेक्टर
  2. मोसंबी – एक लाख रूपये प्रति हेक्टर
  3. डाळिंब – १ लाख ६० हजार
  4. काजू – १ लाख २० हजार
  5. केळी – १ लाख ७० हजार
  6. द्राक्ष – ३ लाख ८० हजार
  7. आंबा – १ लाख ७० हजार
  8. स्ट्रॉबेरी – २ लाख ४० हजार
  9. पपई – ४० हजार
  10. चिकू – ७० हजार
  11. पेरू – ७० हजार
  12. सीताफळ – ७० हजार

चालू हंगामातील म्हणजेच २०२४ सालातील मृग बहारातील योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत

  • संत्रा, पेरु, लिंबू, द्राक्ष (क)  – २५ जून २०२४
  • मोसंबी, चिकू – ३० जून २०२४
  • डाळिंब – १४ जुलै २०२४
  • सिताफळ – ३१ जुलै २०२४
PM Kisan 17th installment
PM Kisan 17th installment

Leave a Comment