Crop Guarantee : शेतकरी बांधवांनो शेतमालाचे भाव काय असणार ?

Crop Guarantee : राज्यातील शेतमालांच्या हमीभावावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी असताना मागील वर्षापासून सोयाबीनसह कापूस मका आणि हरभऱ्याचेही भाव हमीभावापेक्षा कमी असल्याचे दिसून आल्यानंतर आता वर्षाखेरपर्यंत शेतमालांचा भाव काय असणार? आगामी दोन-तीन महिन्यात तरी शेतमालाला हमीभाव मिळणार का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. दरम्यान कृषी विभागाने ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंत शेतमालाच्या संभाव्य किमती काय असणार? हे सांगितलंय.

कापूस मध्यम धाग्यासाठी सरकारनं मागील वर्षीच्या तुलनेत ५०१ रुपयांची वाढ केली असून कापसाला २०२४-२५ वर्षासाठी ७१२१ रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. तर कापूस लांब धाग्यासाठी ७५२१ प्रतिक्विंटल भाव देण्यात आला आहे. सोयाबीनच्या हमीभावात २९२ रुपयांची वाढ करून ४८९२ रुपये प्रतिक्विंटलचा भाव जाहीर करण्यात आला आहे. २०२४ वर्षासाठी तूरीला प्रतिक्विंटल ७५५० रुपये, मुग ८६८२ रुपये,उडीद ७४०० रुपये, मका २२२५ रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. पण अंदाजानुसार किती भाव मिळण्याची शक्यता आहे पहा..

Crop Guarantee

सोयाबीनला काय मिळणार भाव ?

  • सोयाबीनच्या हमीभावावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी असताना मागील वर्षभरापासून सोयाबीनला हमीभावही न मिळाल्याचे चित्र होते.
  • सरासरी होऊन कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या खरीपातील सोयाबीन पीक धोक्यात आले होते परिणामी उत्पादनही घटले.
  • यंदा मागील वर्षीच्या तुलनेत सोयाबीन उत्पादनात आठ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता कृषी विभागानं वर्तवली आहे.
  • ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान सोयाबीनला 4300 ते 5000 रुपये प्रति क्विंटल असण्याची शक्यता आहे.

कापसाला अंदाजे भाव एवढा

  • 2023 मध्ये मागील पाच वर्षाच्या तुलनेत सर्वात कमी कापसाचे उत्पादन झाल्याचे दिसून आलं.
  • 295 लक्ष गाठी एवढेच उत्पादन मागील वर्षी झालं होतं.
  • भारतात चालू वर्षात कापसाचे उत्पादन वाढल्याचे कृषी विभागांनं सांगितलंय.
  • ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कापसाचे अंदाजे किंमत 7000 ते 8000 रुपये प्रति क्विंटल असेल असा अंदाज कृषी विभागाने दिला आहे.

Leave a Comment