या महिलांना मिळणारा चार हजार पाचशे रुपये
तात्काळ अनुदान वितरण प्रक्रिया
राज्य शासनाच्या आदेशानुसार, तात्काळ अनुदान प्रक्रिया केली जाणार आहे. या निधीचा लाभ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. या निधीचे वाटप शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या आधारे करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
शासनाच्या निर्णयात मोठा बदल
जानेवारी या महिन्यामध्ये शासनाने नवीन निर्णय घेतलेला होता, या अंतर्गत नुकसान भरपाईच्या निकषात मोठे बदल करण्यात आलेले होते. राज्य शासन या अगोदर फक्त 2 हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई दिली जात होती ,परंतु आता जिरयत, बागायत आणि बहुवार्षिक पिकांसाठी 3 हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई दिली जाणार आहे. या बदलामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लाभ मिळेल.
विभागनिहाय अनुदान वाटप
अनुदानाचे विभाग निहाय वाटप करण्यात आले आहे, ज्यामुळे प्रत्येक भागातील नुकसानीचा विचार करून अनुदानाची मदत दिली जाणार आहे.
नागपूर विभागासाठी 8 कोटी रुपये.
पुणे विभागासाठी 2 कोटी रुपये.
नाशिक विभागासाठी 7 कोटी रुपये.
संभाजीनगर विभागासाठी 3 कोटी रुपये.
कोकण विभागासाठी 3 कोटी रुपये.
हा निधी प्रत्येक भागातील नुकसानीचा विचार करून मंजूर करण्यात आलेला आहे. यामुळे सर्व भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल
अवकाळी पावसाची नुकसान भरपाई
शेतकऱ्यांच्या पिकांचे अवकाळी पावसामुळे मार्च ते मे 2024 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झालेले होते. यामुळे राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. अवकाळी पावसामुळे मार्च ते मे 2024 या कालावधीमध्ये झालेल्या नुकसान भरपाई साठी पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 44 कोटी 74 लाख 25 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यामध्ये पुणे विभागासाठी 42 कोटी रुपये आणि नागपूर विभागासाठी 2 कोटी रुपये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हा निधी वाटप केला जाणार आहे.
फेब्रुवारी या महिन्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत
फेब्रुवारी 2024 मध्ये अवकाळी पावसामुळे बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. राज्य शासनाने बुलढाणा आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांसाठी विशेष मदतीची घोषणा करण्यात आलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 5 कोटी 5 लाख 7 हजार रुपये. तर यवतमाळ जिल्ह्यासाठी 17 लाख रुपयांची मदत मंजूर झाली आहे. या शासनाच्या निर्णयामुळे बुलढाणा जिल्ह्यातील आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या आर्थिक मदतीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.