गणेशोत्सवाला जोरदार पावसाचा अंदाज
मराठवाडयात गणेशाचं स्वागत पावसानं होणार आहे. हवामान विभागानं मराठवाड्यात जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. आज छत्रपती संभाजीनगरसह लातूर धाराशिव जिल्हे वगळता उर्वरित मराठवाडयाला जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे.
या योजनेअंतर्गत पती पत्नीला मिळणार 27 हजार रुपये जाणून घ्या येथे क्लिक करून
त्याला लागूनच ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर ओडिशा, दक्षिण पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे येताना ही प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट?
मराठवाड्यात आज दि ७ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, कोकण घाटासह विदर्भात पावसाचा आज अधिक जोर असेल. दरम्यान, प्रादेशिक हवामान केंद्राने मराठवाड्या या २४ तासात पावसाची हजेरी लागणार असल्याचा अंदाज वर्तवलाय.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे. मात्र, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात कमी पावसाचा अंदाज आहे. एकदा मान्सून राज्यात सक्रिय झाल्यावर मात्र, त्या भागात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होण्याची शक्यता आहे.