New Ration Card : सर्वांना स्वस्तात पोषक अन्न मिळावे यासाठी सरकारकडून रेशन दिले जाते. स्वस्त धान्य दुकानावर हे रेशन मिळते. यामध्ये गहू, तांदुळ यासाह वेगवेगळी धान्ये, डाळ, तेल आदींचा समावेश असतो. सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो.
या योजनेसाठी पात्र असल्यास कोणत्याही कार्यालयात न जाता तुमच्या पत्त्यावर तुमचे रेशन कार्ड (How To apply for new Ration Card) येते. दरम्यान, जाणून घेऊ या घरबसल्या मोबाईलमधून रेशन कार्ड कसे काढायचे.
New Ration Card
- घरबसल्या नवीन रेशनकार्ड काढता येते. त्यासाठी तुम्हाला सर्वांत अगोदर rcms.mahafood.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल.
- त्यानंतर साईन इन / रजिस्टर या ऑप्शनवर जावं लागेल. या ऑप्शनवर गेल्यानंतर तुम्हाला पब्लिक लॉगीन या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर न्यू यूजर साईन अप हियर या ऑप्शनवर क्लिक करा.
- त्यानंतर आय वान्ट टू अप्लाय न्यू रेशन कार्ड या ऑप्शनला सिलेक्ट करावे.
- या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लगेच तुमची माहिती भरण्यासाठी नवा पर्याय खुला होईल. तिथे दिलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी.
- अर्जदाराचे नाव, आधार क्रमांक, लॉगीन आयडी, पासवर्ड (क्रियेट करावा लागेल.) लिंग, मोबाईल क्रमांक, ई-मेल अॅड्रेस व्यवस्थित भरून घ्या.
- त्यानंतर समोर दिसत असलेला कॅप्चा व्यवस्थित भरावा. त्यानंतर गेट ओटीपी या ऑप्शनवर क्लीक करा.
- ओटीपी टाकल्यानंतर सबमीट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.
- ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यक्रमाच्या संकेतस्थळावर तुमचे खाते उघडले जाईल.
- एकदा अकाऊंट उघडल्यानंतर पुन्हा एकदा लॉगीनवर जाऊन रजिस्टर्ड युजवरवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर लॉगीन, पासवर्ड टाकून लॉगीन करावे.
- त्यानंतर अॅप्लिक्शन रिक्वेस्टमध्ये अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड हा ऑप्शन दिसेल. तिथे तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर नव्या रेशनकार्डसाठीची संपूर्ण
- प्रक्रिया पार पाडावी. गरजेची असणारी कागदपत्रे अपलोड करावीत.
- तुम्ही नव्या रेशनकार्डसाठी पात्र असाल तर तुम्हाला तुमचे नवे रेशन कार्ड मिळून जाईल.
कागदपत्रे कोणकोणती लागतात ?
नवे रेशनकार्ड काढण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे लागतात. यामध्ये तुम्हाला ओळखपत्र (पॅन कार्ड, मतदानकार्ड, पासपोर्ट), रहिवासी प्रमाणपत्र (वीजबिल, टेलिफोन बिल, व्होटर आयटी, पासपोर्ट), कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, स्वघोषणापत्र, चौकशी अहवाल ही कागदपत्रे लागतात.