मोबाइलवरून कशी करावी ई पीक पाहणी 

E-Peek Pahani

पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही.

आता मोबाइल अँप्स वरून पीकपेरा नोंदणी शक्य आहे.

ई-पीक पाहणीचे अपडेटेड व्हर्जन ३.०.१ ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

1 ऑगस्टपासून नोंदणीला सुरुवात होणार आहे,

15 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना ही नोंदणी करता येईल.

पीक पाहणीमुळे पीक कर्ज देणे, पीक विमा भरणे किवा पीक नुकसानभरपाई शक्य होणार आहे.

अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावता येणार आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला, हे अचूक समजणार आहे.