भारतात सोने खरेदी करून गुंतवणूक करण्याची सवय ही बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे.
आता गुंतवणूकदार प्रत्यक्ष सोने खरेदी करण्यापेक्षा डिजिटल सोन्यात पैसे गुंतवण्याचा पर्याय निवडत आहेत.
डिजिटल गोल्डमध्ये तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून पैशांची गुंतवणूक करू शकता.
अशा प्रकारच्या सोन्याची तुम्ही कधीही, केव्हाही खरेदी किंवा विक्री करू शकता.
डिजिटल गोल्ड खरेदी केल्याने ते चोरी होण्याची भीती नसते.
डिजिटल सोने विकताना तुम्हाला सोन्याच्या किमतीनुसारच रिटर्न्स मिळतात.
म्हणजेच सोन्याची किंमत वाढल्यास त्याचा थेट फायदा तुम्हाला मिळू शकतो.
डिजिटल सोने खरेदी करताना किंवा विक्री करताना तुम्हाला घडणावळीचे पैसे देण्याची गरज नाही.