प्रधानमंत्री पीक विमा (PMFBY) योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024-25 मधील विमाधारक शेतकऱ्यांचं सततच्या पावसामुळे शेतात पाणी शिरल्यानं नुकसान झालं असेल तर 72 तासांच्या आत कळवणं बंधनकारक आहे.
सर्वप्रथम प्ले स्टोअरवरून Crop insurance App ॲप डाऊनलोड करायचा आहे.
त्यानंतर Continue as guest हा पर्याय निवडा
यात पीक नुकसानाची पूर्वसचना या पर्यायावर क्लिक करा
यानंतर तुमचा मोबाईल नं टाका. यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवर ओटीपी येईल. हा ओटीपी टाका
पुढील टप्प्यात हंगाम-खरीप, वर्ष-2024 योजना आणि राज्य निवडा
नोंदणीचा स्त्रोत CSC निवडा. यात पावतीचा क्रमांक म्हणजेच पॉलिसी क्रमांक टाका.
ज्या गट क्रमांकमधील पिकाची तक्रार तुम्हाला करायची असेल किंवा स्वतंत्र तक्रार करायची असेल तर तो अर्ज निवडून स्वतंत्र तक्रार करा
नक्की कशामुळे नुकसान झाले? याचा तपशील भरा. पिकांचा फोटो काढून सबमीट करा
यानंतर तक्रार यशस्वीरित्या नोंद केली असल्याची खात्री देणारा docket Id मिळेल.