Iphone 16 Series : आयफोन 16 लॉन्च, भारतात किती रुपयांना मिळणार?

Iphone 16 Series : मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून संपूर्ण जग अँपल कंपनीच्या आयफोन 16 (iphone 16 Series Launch) या नव्या फोन सिरीजची वाट पाहात होतं. या नव्या फोनमध्ये आतापर्यंतचे सर्वांत दमदार फिचर्स असणार असे सांगितले जात होते. हा फोन कसा असणार? त्याची किंमत काय असेल ? असे अनेक प्रश्न लोकांना पडले होते. दरम्यान, आता आयफोन 16 सिरीजचे प्रो, मॅक्स मॉडेल्सची खरीखुरी किंमत तसेच या फोनचे फिचर्स समोर आले आहेत.

आयफोन 16 या फोनची किंमत फोन 799 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच साधारण 67,000 रुपयांपासून पुढे आहे तर आयफोन 16 प्लसची किंमत 899 अमेरिकी डॉलर्स म्हणजेच साधारण 75500 रुपये असेल. आयफोन 16 प्रो (128 जीबी) मॉडेलची किंमत 999 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 83,870 रुपये असणार आहे. आयफोन 16 प्रो मॅक्स (256 जीबी) मॉडेलची किंमत 1199 अमेरिकी डॉलर्स म्हणजेच साधारण एक लाख रुपये असणार आहे.

Iphone 16 Series

Indian price of iphone 16

  • वर नमूद केलेली किंमत ही स्टँडर्स किंमत आहे.
  • मात्र प्रत्येक देशात तेथील स्थानिक कररचनेनुसार आयफोन 16 सिरीजच्या फोनची किंमत वेगवेगळी असणार आहे.
  • भारतात आयफोन 16 हा फोन 79900 रुपयांना मिळणार आहे.
  • तर आयफोन 16 प्लस हा फोन 89900 रुपयांना मिळेल.
  • आयफोन 16 प्रो हा फोन 1 लाख 19 हजार 900 रुपयांपासून पुढे मिळेल.
  • तर आयफोन 16 प्रो मॅक्स हा फोन भारतीय बाजारात 1 लाख 44 हजार 900 रुपयांना मिळेल.
  • 13 सप्टेंबरपासून या फोनला प्री-ऑर्डर करता येणार आहे. 20 सप्टेंबरपासून या फोनची प्रत्यक्ष विक्री चालू होईल.

Leave a Comment