Google Pay

Google Pay : ‘या’ देशात ‘गुगल पे’ बंद करण्याचा निर्णय, नेमकं कारण काय ?

Google Pay : सध्या तंत्रज्ञानाचे युग आहे. कधीकाळी बँकेशी संबंधित एखादे काम करण्यासाठी पूर्ण दिवस जायचा. आता मात्र तुम्ही पैशांचे व्यवहार मोबाईल किंवा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून काही सेकंदांत पूर्ण करू शकता. यूपीआयच्या मदतीने (upi payment) ऑनलाईन पद्धतीने पैशांचे व्यवहार करणे आणखी सोपे झाले आहे. ऑनलाईन पेमेंट क्षेत्रात रोज नवनवे बदल होत असतात. सध्या ऑनलाईन पेमें प्लॅटफॉर्म गुगल पेने मोठे निर्णय घेतला आहे. सध्या गुगल पे हे अ‍ॅप एका देशात बंद करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेत 4 जून 2024 पासून गुगल पे हे अ‍ॅप बंद करण्यात आले आहे. हा निर्णय नेमका का घेण्यात आला? याबाबत नेमके आणि ठोस कारण समोर आलेले नाही. गुगल पे हे अ‍ॅप (Google Pay App) ऑनलाईन व्यवहारांसाठी सुरक्षित मानले जाते. भारताने वापराच्या बाबतीत हे अ‍ॅप दुसऱ्या क्रमांकावर आहे. असे असताना अमेरिकेत हे अ‍ॅप बंद करण्यामागचं कारण काय? असं विचारलं जातंय.

Google Pay 

गुगल पे बंद करण्यामागचं ‘हे’ आहे कारण

गुगलने अमेरिकेत गुगल पे हे अ‍ॅप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत गुगलकडून गुगल वॉलेटला प्रमोट केलं जातंय. तसेच (Google Pay online) ऑनलाईन पेमेंट आणखी सोपे व्हावे यासाठी गुगलकडून प्रयत्न केले जात आहेत. याच कारणामुळे अमेरिकेत गुगल पे बंद करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

भारतात काय होणार ?

भारतात मात्र गुगल पे हे अ‍ॅप बंद होणार नाही. ते भारतात जसे आहे, तसेच चालू राहील. भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. हे अ‍ॅप वापरून आर्थिक व्यवहार करणाऱ्यांचे भारतात मोठे प्रमाण आहे. हे ग्राहक हातातून जाऊ नयेत म्हणून गुगल पे या अ‍ॅपची सुविधा भारतात चालूच राहील. दुसरीकडे अमेरिकेत गुगल पेच्या तुलनेत गुगल वॉलेट वापरणाऱ्यांचे प्रमाण हे पाच पट अधिक आहे. याच कारणामुळे अमेरिकेत गुगल पे हे अ‍ॅप बंद केले जात आहे. गुगलने अमेरिकेत गुगल वॉलेट हे अ‍ॅप 2022 साली लॉन्च कले होते. हेच अ‍ॅप भारतात 2024 साली लॉन्च करण्यात आले. गुगल वॉलेट हे अ‍ॅप सध्या गुगल पेवर उपलब्ध आहे.

Gold Loan
Gold Loan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *