Aadhaar Authentication

Aadhaar Authentication : तुमच्या आधार कार्डचा कुठे-कुठे वापर झाला, सोप्या पद्धतीने हिस्ट्री तपासा

Aadhaar Authentication : तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुमचं कोणतही काम होणार नाही. सध्या आधार कार्ड हे कागदपत्र सर्वात महत्वाचे आहे, प्रत्येक कामात तुम्हाला आधार कार्ड बंधनकारक असते. तुम्हाला मोबाइलचं सीम कार्ड जरी नवीन घ्यायचं असेल तरीही आधार कार्ड मागितले जाते. हे कार्ड ओळखपत्र म्हणूनही वापरले जाते. या कार्डाचा अनेक ठिकाणी वापर केला जातो. आता या कार्डचा वापर आपण कुठे-कुठे केला आहे याची माहिती आपल्याला मिळते.

सध्या ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुमचे आधार कार्ड (Aadhar Card) कुठे वापरले जात आहे याची माहिती असणे गरजेची आहे. तुमच्या आधार कार्डचा वापर करुन कोणी बेकायदेशीर कामे करत आहे का ? याची माहितीही मिळते.

Aadhaar Authentication

आधार कार्डमध्ये महत्त्वाची माहिती असते आणि बँक खाती आणि इतर गोष्टीही त्याच्याशी जोडलेल्या असतात. तुमचे आधार कार्डचा चुकीचा वापर केल्यास तुमच्या खात्यावरील पैसे जाऊ शकतात.

UIDAI ने सर्व आधार वापरकर्त्यांना त्या कार्डची हिस्ट्री पाहण्याची सुविधा दिली आहे. यामध्ये तुम्ही तुमचे आधार कार्डचा वापर कुठे केला आहे हे जाणून घेऊ शकता. तुम्हाला मागील सहा महिन्यांचा आधार कार्डची हिस्ट्री काढता येते.

Aadhaar Authentication History
  1. आधार कार्डची हिस्ट्री तपासण्यासाठी, तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://resident.uidai.gov.in/aadhaar-auth-history किंवा mAadhaar ॲपवर लॉग इन करावे लागेल.
  2. माहिती संकलित करण्यासाठी तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबर आवश्यक आहे.
  3. हिस्ट्रीमध्ये, तुम्हाला तुमच्या आधार कार्डसाठी ऑथेंटीफिकेशन म्हणजेच बायोमेट्रिक डेमोग्राफिक सारखे डिटेल्स कसे भरले याची माहिती मिळेल.
  4. आधार कार्ड कधी आणि कोणत्या तारखेपासून वापरले जात आहे. याबाबतही माहिती मिळेल.
  5. आधार कार्डची माहिती मिळाल्यावर UIDAI कडून रिस्पॉन्स कोड जारी केला जातो.
  6. जर तुमच्या कार्डचा वापर चुकीचा करत असेल तर तुम्ही AUA किंवा UIDAI च्या हेल्पलाइन नंबरवर तक्रार करू शकता.

    Senior Citizen Card
    Senior Citizen Card

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *