मोफत रेशन कार्ड कसं काढावं
Free Ration Card
घरबसल्या नवीन रेशनकार्ड काढता येते. त्यासाठी तुम्हाला सर्वांत अगोदर rcms.mahafood.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल.
त्यानंतर साईन इन / रजिस्टर या ऑप्शनवर जावं लागेल. या ऑप्शनवर गेल्यानंतर तुम्हाला पब्लिक लॉगीन या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर न्यू यूजर साईन अप हियर या ऑप्शनवर क्लिक करा.
त्यानंतर आय वान्ट टू अप्लाय न्यू रेशन कार्ड या ऑप्शनला सिलेक्ट करावे.
या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लगेच तुमची माहिती भरण्यासाठी नवा पर्याय खुला होईल. तिथे दिलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी.
अर्जदाराचे नाव, आधार क्रमांक, लॉगीन आयडी, पासवर्ड क्रियेट करावा लागेल. लिंग, मोबाईल क्रमांक, ई-मेल ऍड्रेस व्यवस्थित भरून घ्या.
त्यानंतर समोर दिसत असलेला कॅप्चा व्यवस्थित भरावा. त्यानंतर गेट ओटीपी या ऑप्शनवर क्लीक करा.
ओटीपी टाकल्यानंतर सबमीट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.
ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यक्रमाच्या संकेतस्थळावर तुमचे खाते उघडले जाईल.
अधिक वाचा